
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२५
अनिकेत रेडीजला अजिंक्यपद

रत्नागिरीतील राधाकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या सहाव्या मानांकित अनिकेत रेडीज याने पटकावले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीतील डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या अनिकेतने साईप्रसाद साळवी विरुद्ध विजयी होत ऐकूण ७ फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह निर्विवाद प्रथम स्थान प्राप्त केले. प्रत्येकी ६ गुणांसह यश गोगटे ( रत्नागिरी ) , साहस नारकर ( चिपळूण ) व मिलिंद नरवणकर ( घरडा केमिकल्स ) यांनी स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ स्थान प्राप्त केले.
अंतिम फेरीतील काही महत्वाचे निकाल पुढीलप्रमाणे : यश गोगटे विजयी विरुद्ध प्रवीण सावर्डेकर , मिलिंद नरवणकर विजयी विरुद्ध आर्यन धुळप , साहस नारकर विजयी विरुद्ध सिद्धेश मदने. तत्पूर्वी सहाव्या फेरीतील एका उत्कंठावर्धक डावात साईप्रसाद साळवी याने प्रथम मानांकित सौरिष कशेळकरचा पराभव केला.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ श्री. नीलेश मलूष्टे , मिलिंद दळी , राजेश रेडीज , समीर कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
खुला गट क्रमांक पाच ते पंधरा :
सौरिश कशेळकर, साळवी साईप्रसाद, अनंत एस गोखले, माधव काणे , आर्यन धुळप , प्रवीण सावर्डेकर , सोहम रुमडे , सिद्धेश मदने, विवेक जोशी, श्रीहास नारकर, सई प्रभुदेसाई
उत्तेजनार्थ पारितोषिके :
वयोगट ३६-५५ प्रथम : जितेंद्र पटेल
वयोगट १६-३५ प्रथम : कौस्तुभ हर्डीकर
सर्वोत्तम महिला खेळाडू : निधी मुळ्ये
सर्वोत्तम वरिष्ठ खेळाडू : सुहास कामतेकर
१५ वर्षाखालील गट :
मूले – अपूर्व बंडसोडे, मिहीर काणेकर, लवेश पावसकर
मुली – पद्मश्री वैद्य, तनया आंब्रे, गार्गी सावंत
१२ वर्षाखालील गट :
मूले – आयुष रायकर, अथर्व साठे, अलिक गांगुली
मुली – राधा पाध्ये,सान्वी सरखोत, आद्या पावसकर
०९ वर्षाखालील गट :
मूले – शर्विल शहाणे, आरव निमकर, पारस मुंडेकर
स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल २२ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटूंसह एकूण १२० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेचे नियोजन व मुख्य पंच कामगिरी विवेक सोहनी यांनी पार पाडली. सहाय्यक पंच म्हणून लांजा येथील प्राची मयेकर , चैतन्य भिडे यांनी सहकार्य केले. अश्या मोठ्या स्वरूपाची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्याबद्दल जिल्हा बुद्धिबळ संघटने कडून श्री. राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे आभार मानण्यात आले.