
शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक
चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीस शिवसेना उपनेते तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य नेते मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.
त्यावेळी मार्गदर्शन करताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले की, सभासद नोंदणी मोहीम – ही केवळ एक प्रक्रिया नसून आपल्या पक्षाची ताकद सिद्ध करणारा मूलभूत टप्पा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःपासून सुरुवात करत, घराघरात जाऊन सभासद नोंदणी पूर्ण करावी.
नवीन संघटनात्मक रचना – मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जिल्हा संघटन प्रमुख, विधानसभा प्रमुख, महानगर प्रमुख अशा नवीन पदांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक पदाची निवडणूक प्रक्रियेतून निवड होणार असून, हे पक्षाच्या पारदर्शक आणि कार्यकर्ते-केंद्रित धोरणाचे प्रतीक आहे.
Digital App चा सशक्त वापर – नवीन निवडणूक प्रणाली, सभासद नोंदणी, बोगस मतदानविरोधी यंत्रणा यासाठी खास डिजिटल App सादर करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे पक्ष अधिक मजबूत केला जाणार आहे.
महायुतीच्या निवडणुका – कार्यकर्त्यांचा सन्मान सर्वोच्च पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान अबाधित राहणार याची हमी आम्ही घेतो.
कार्यकर्त्यांवर आधारित नेतृत्व नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांपेक्षा ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे संघटनेत योगदान दिलं आहे, त्यांनाच आता जबाबदारी दिली जाणार आहे. हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिंदे साहेबांची दिशा आहे. प्रत्येक तालुक्यात बैठकांचा आग्रह जिल्हा कार्यकारिणी बैठका वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये घेऊन पक्षाचं नातं तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा निर्धार यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आजच्या बैठकीने एक नवा जोम आणि दिशा ठरवली आहे. चिपळूण नगरपालिका विजयासाठी भगवा फडकवण्याचा निर्धार आपण आज पुन्हा एकदा केला आहे.
आपण सगळे एकत्र राहून, संघटनेच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिवसेनेचा झेंडा पुन्हा उंचावू, असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम, शिवसेनेचे सचिव किरणजी पावसकर, आमदार किरण भैया सामंत, शिवसेना उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित, शशिकांतजी चव्हाण, रश्मीताई गोखले, शिल्पाताई सुर्वे, अप्पा कदम, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र महाडीक, यांसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.