
जयगड-निवळी रस्त्यावर अपघात, गॅस टँकर पलटी
रत्नागिरी : जयगड येथून बेंगलोरला जाणारा गॅस टँकर निवळी गणपतीपुळे रोड नजीक उलटला. सुदैवाने गॅस गळतीचा कोणताही धोका नाही आहे असे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास घडली असून या ठिकाणी तत्काळ ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे आपल्या टीमसह दाखल झाले असून या ठिकाणी वाहतूक देखील सुरळीत चालू आहे.