
आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं.१ – शतकोत्तर अमृत महोत्सवाचा शुभारंभ!
आज मालगुंड येथील १७५ वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ च्या शतकोत्तर अमृत महोत्सव शुभारंभ कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
या विशेष प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते शाळेच्या १७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचं प्रतीक म्हणून लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित आजी-माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, ही शाळा केवळ शिक्षणसंस्था नसून संस्कारांची कार्यशाळा आहे, असं सांगताना मला विशेष आनंद झाला. मालगुंड गावातूनही भविष्यात भारत रत्न घडावा, हीच मनोभावे इच्छा आणि शुभेच्छा !
आजच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात, विद्यार्थ्यांनी त्याचा विधायक आणि सकारात्मक वापर केल्यास भारत अमेरिकेपेक्षाही पुढे जाईल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.
उद्योग प्रकल्पांबाबत विरोध करणाऱ्यांचा विचारपूर्वक विरोध करणे गरजेचे आहे. आपल्याच मुलांच्या भविष्याचा विचार करता, उद्योग प्रकल्पांसाठी समर्थन आवश्यक आहे असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या कार्यक्रमानिमित्त सांगितलं.
या सोहळ्याला अध्यक्ष सुनील मयेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, श्रीकांत मेहेंदळे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सरपंच श्वेता खेऊर यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.