जमिनी विकू नका, आपण संपू, राज ठाकरेंना वेगळीच शंका;

आपल्या रायगडमध्ये कोण येतेय, कोण राहतेय, माहिती नाही. उत्तरेमधील अनेकांनी कोकणात जमिनीच्या जमिनी घेतल्या आहेत. आमच्या लोकांना इतके कळत नाही, यातून आपणच संपणार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली. तुमच्या जमिनी घेण्यासाठी आले तर जमिनी विकायच्या नाहीत, त्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून येणार असल्याचे सांगा, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. पनवेलमधील शेकपाच्या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. सत्ताधाऱ्यांना इशारा देताना मराठी माणसाला आवाहन केले. आपल्या जमिनी विकू नका, वेळीच सावध व्हा, असे राज ठाकरे म्हणाले.

आज आपण या गोष्टी वाचवल्या नाहीत, तर काहीच राहणार नाहीत. रायगडमध्ये अमराठी आमदार नगरसेवक निवडून येतील, त्याला वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. विमानतळावर १०० टक्के मराठी मुले-मुली कामाला लागले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणालेबाहेरचे उद्योगपती येणार जमिनी घेणार, वाटेल ते थैमान घालणार, आपल्याकडे काय राहणार.. जमिनी विकू नका. राज्य सराकरने अर्बन नक्षल कायदा आणलाय. तुम्ही जर कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतो, एकदा त्यांनी अटक करू देच, त्यांना दाखवतो. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग आणता येणार नाही. मराठी माणसाला सन्मान देऊनच उद्योग येतील, असे राज ठाकरे म्हणाले.सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये.. ते बंद झाले होते. तेही अमराठी लोकांचे आहेत. ते कसे काय सुरू आहे. रायगड जिल्हा आहे ना.. छत्रपतींची राजधानी आहे, इथे मग इथे हे काय सुरू आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटून टाकायचे आणि मूळ विषयावरून लक्ष विचलीत करायचे धंदे सुरू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.मराठी आणि गुजराती लोकांची भांडणे लावायचे आणि त्यातून मते कशी काढू शकतो? त्यासाठी हे सत्ताधाऱ्यांचे सर्व सुरू आहे. पण आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होणार नाही. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. तुमच्या कृतीमधून महाराष्ट्राला नख लागतेय, ते समजल्यावर अंगावर आल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल लाजिरवाणे बालले जाते. मराठी माणसे विकत घेण्यासारखी आहेत, असं बोलले जातेय. मराठी माणसे विकली जातात. जर असे असेल तर छत्रपतींचे पुतळे कशासाठी ठेवायचे. त्यांनी काय शिकवले हे विसरलात का? ज्यावेळी स्वाभिमान शून्य माणसं उरतता तेव्हा फक्त जिवंत प्रेते उरतात, हे बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य आहे. तुम्ही जिवंत प्रेतासारखं राहू नका. तुम्ही मोठं व्हा.. पण महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका. जमिनी विकू नका, असे राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button