
राजापूर तालुक्यातील सोलगाव परिसरात स्ट्रीट लाईट, बॅटर्या चोरणार्याला ग्रामस्थांनी पकडले
राजापूर तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्यांच्या बॅटर्या चोरी करणार्या एका भंगार व्यावसायिकाला ग्रामस्थानी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलगाव परिसरात शासकीय निधीतून रस्त्यावर बसविण्यात आलेल्या सोलर स्ट्रीट लाईट तसेच स्ट्रीट लाईटच्या बॅटर्या चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत होते. यामुळे ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईट व बॅटर्या चोरणार्याचा माग काढण्यासाठी पाळत ठेवली होती. अशातच गुरूरी दिवसाढवळ्या सोलर स्ट्रीट लाईटची बॅटरी काढून नेताना एक भंगार व्यावसायिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत राजापूर पोलिसांशी संपर्क साधून बॅटरी चोरणार्या भंगार व्यावसायिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.www.konkantoday.com