
लोटिस्मा’च्या वक्तृत्व स्पर्धेला उत्तम प्रतिसाद .


चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या टिळक पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत महाविद्यालयीन गटात आनंदराव पवार कॉलेजची वेदिका विष्णू हरवडे प्रथम, डिबीजेची मीरा मनोज पोंक्षे द्वितीय, तृतीय क्रमांक मार्गताम्हाने कॉलेजची सिद्धी विजय लांजेकर हिला मिळाला. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक सती हायस्कुलची मृणयी प्रसाद जोग, द्वितीय क्रमांक एसपीएमची स्वरा प्रराग खैर, आणि तृतीय क्रमांक युनायटेडच्या ओवी सागर भावे हिला मिळाला. प्राथमिक गटात प्रथम क्रमांक युनायटेड स्कूल मधील स्वराज रामकृष्ण कदम याला द्वितीय क्रमांक वसंतराव भागवत विद्यालय मार्गताम्हणेची शुभ्रा मिलिंद यादव आणि सती हायस्कूलच्या वेदांत महेंद्र महाडीक याला तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. सहभागी स्पर्धकांनी अभ्यासपूर्वक आपली मते व्यक्त केली. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून मुकुंद कानडे, सुनिल पाध्ये, संगीता जोशी, माधवी जोशी, अविनाश फडके, श्रीम. शालन रानडे, श्री. मांडवकर, अविनाश फणसे, वैशाली चितळे यांनी उत्तम परीक्षण केले. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता वाचनालयाचे संचालक, पदाधिकारी, स्पर्धा विभाग प्रमुख आराध्या यादव, अनिल धोंड्ये, मधुसूदन केतकर आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. मधुसूदन केतकर यांनी उपस्थित सहभागी सर्व गटातील स्पर्धक यांना स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. मुकुंद कानडे, शालन रानडे आणि सुनिल पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, विनायक ओक, अभिजीत देशमाने, राष्ट्रपाल सावंत आदी उपस्थित होते.