
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये येथे अमली पदार्थ बाळगणार्या ५ तरूणांवर गुन्हा
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये येथे अंमली पदार्थ बाळगणार्या ५ तरूणांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १७ ग्रॅम वजनाचा गांजा व एक फॉर्च्युनर कार असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अमान नौशाद शेखासन (२६, रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी) राज नितीन राऊत (२५, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी), कैफ होडेकर (२१, रा. भाट्ये, रत्नागिरी), दानिश मेहबूब मुल्ला (रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी) व मुसद्दीक म्हसकर (२२, रा. कर्ला रत्नागिरी) अशी गुन्ह दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून त्यांच्याविरूद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांकडून संशयितांना गुरूवारी न्यायालयापुढ हजर करण्यात आले. यावेळी संशयितांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली.www.konkantoday.com