
रामदास कदम यांचे विरोधक सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ
रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सदानंद कदम यांना या भेटीचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, ही भेट व्यावसायिक कारणासाठी आणि गणपतीच्या निमित्ताने झाली. आम्ही व्यावसायिक कारणासाठी महिन्यातून एकदा परब यांना भेटतो. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, मुंबईतील सावली रेस्टॉरंट अँड बार हा प्रत्यक्षात डान्स बार आहे. जिथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून काही मुलींना ताब्यात घेतले होते. तसेच वाळू प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपी परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला होता.
www.konkantoday.com