
महावितरणची अरेरावी, कुलूप तोडून स्मार्ट मीटर बसविल्याने संताप
दिवसेंदिवस स्मार्ट मीटर बसवण्याबाबतचा विरोध वाढत चालला असून बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतला. पूर्व कल्पना न देता घरातील मीटर बॉक्सचे कुलूप तोडून बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरचा जाब महावितरणच्या अधिकार्यांना विचारला. या घडल्या प्रकाराबाबत महावितरणने दिलगिरी व्यक्त केली व यापुढे पूर्व कल्पना दिल्यानंतरच मीटर बसवला जाईल, असे लेखी पत्र महावितरण अधिकार्यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांना दिले.
यावेळी चिवेली येथील कासिम बाचने, हशमत महालदार, मुजफ्फर दिवेकर यांच्या मीटर बॉक्सचे कुलूप फोडून स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा प्रकार मांडण्यात आला. सर्वत्र विरोध असताना मीटर का बसवले जात आहेत, असा सवाल करत जनतेच्या संमत्तीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही. प्रशासनाने हा प्रकार थांबवावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला.
www.konkantoday.com