मंडणगड शहरातील बाजारपेठेतील अमित इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला अचानक आग

मंडणगड शहरातील बाजारपेठेतील अमित इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला अचानक आग लग्नाचा प्रकार आज दुपारी घडला

आग लागली त्यावेळी दुकान बंद होतेदुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेच्या वेळी दुकानाचे मालक अमित गुजर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुकान बंद असतानाही शटरमधून धूर येत असल्याचे शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच संभाव्य धोका ओळखून मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या मोहिमेत नगरपंचायतीचे कर्मचारी, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले. त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवता आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button