
रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जीवन सावंत यांच्याकडे
रत्नागिरी: रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी, श्री. जि. द. सावंत, यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मूळचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण, श्री. सागर कुवेसकर, हे वैद्यकीय कारणांमुळे रजेवर असल्याने त्यांच्याकडे असलेला रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने 1 ऑगस्ट 2025 रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, श्री. सावंत यांनी त्यांच्या मूळ पदाचे काम सांभाळण्यासोबतच पुढील आदेशापर्यंत रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. श्री. कुवेसकर रजेवरून परत आल्यावर ही व्यवस्था आपोआप संपुष्टात येईल. हे आदेश तात्काळ अंमलात आले आहेत.