
खेड जगबडी पुलाजवळ गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील जगबुडी पुलाजवळ आज सायंकाळी एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, ज्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
दुचाकीवर दोन तरुण प्रवास करत होते. जगबुडी पुलाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचे चाकही निखळून दूर फेकले गेले. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.