
पालकमंत्री उदय सामंत यांनी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्या
जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे; रत्नागिरीत जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
रत्नागिरी:
तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळण्यासाठी शिबीर आयोजन केले जाते.
खेळामुळे जीवनात अनेक संधी प्राप्त होतात. करिअरमध्ये खेळाचा खूप उपयोग करता येतो. कुस्तीचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी दिला आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा खाते त्यांचे विशेष आभारी आहे. असे गौरवोद्गार जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कुस्ती प्रशिक्षण शिबीर उद्घाटनाप्रसंगी काढले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात शुभारंभ झाला. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात रत्नागिरी शहर व परिसरातील सुमारे १० शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना कुस्तीचे बारकावे शिकता यावेत आणि भविष्यात चांगले पैलवान घडावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिडाधिकारी सुनिल कोळी, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी, कार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, उपाध्यक्ष अमित विलणकर, आनंद तापेकर, योगेश हरचेकर, सैफुद्दीन पठान, नवनाथ जाधव, प्रशिक्षक झाकीर सय्यद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.