
रत्नागिरीतील मानाचा “श्री रत्नागिरीचा राजा” आणण्यासाठी गणेशभक्त मुंबईला रवाना
३ ऑगस्ट रोजी श्री रत्नागिरीचा राजाची भव्य आगमन मिरवणूक
रत्नागिरी : सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे वेध सर्वच गणेश भक्तांना लागले आहेत. श्री रत्नागिरीचा राजा हा रत्नागिरीतील मानाचा आणि भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती. प्रतिवर्षा प्रमाणे श्री गणरायाची मूर्ती लालबाग मुंबई येथून आणण्याकरता आज सर्व गणेशभक्त नव्या गाडीसह रवाना झाले. याप्रसंगी श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी उपनगराध्यक्ष राजन शेट्ये, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, निमेश नायर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.
दरम्यान, श्री रत्नागिरीचा राजाची भव्य आगमन मिरवणूक रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजता साळवी स्टॉप येथून सुरू होणार आहे.