
गणेशोत्वासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी २५० विशेष रेल्वेगाड्या सोडणार.
मुंबई महानगरातून गणेशोत्वासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे २५० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. याव्यतिरिक्त मध्य रेल्वे ४४ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवा चिपळूण दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीचा विस्तार आणखी दोन सेवा वाढवून केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त चालविण्यात येणार्या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या २९६ वर पोहचली आहे.www.konkantoday.com