
आमदार प्रसाद लाड यांचा निधी बनावट पत्राचा वापर करून बीडकडे वळवण्याच्या प्रकारात भाजपयुमोच्या माजी सचिवाचाच समावेश.
भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या बनावट लेटरहेडचा वापर करून ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गंभीर फसवणूक उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंके हा भारतीय जनता युवा मोर्चाचा (भाजयुमो) माजी पदाधिकारी असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अमित सोळुंकेने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर भाजयुमोचा महाराष्ट्र प्रदेश सचिव असल्याचे नमूद केले होते. मात्र पक्षाने स्पष्ट केले की त्याला गेल्या वर्षीच पदमुक्त करण्यात आले आहे. मुंबईतील सायन पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद लाड यांच्या नावाचे बनावट पत्र वापरून रत्नागिरी जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत बीडसाठी निधी वळवण्याचा प्रयत्न झाला होता.www.konkantoday.com