
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील सापडलेल्या ड्रग्जप्रकरणी रोहन केमिकल्सचा मालक गवंस गजाआड
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीतून जप्त करण्यात आलेल्या ८८ कोटी रुपयांच्या ड्रग्जप्रकरणी कंपनीचा मालक रोहन प्रभाकर गवंस याला महाड-मुंबई येथून पोलिसांनी गजाआड केले. महाड एमआयडीसी पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पथक याबाबत संयुक्तरित्या तपास करत आहे.
पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोहन केमिकल्स कंपनीवर धाड टाकत ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा ८८ कोटी रुपयांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी मच्छिंद्र भोसले (रा. जिते-महाड), सुशांत पाटील (मोहप्रे-महाड), शुभम सुतार (पाचगाव-करवीर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली होती.
रोहन केमिकल्स कंपनीचा मालक रोहन गवंस मात्र फरार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याच्याही मालाड-मुंबई येथून मुसक्या आवळल्या आहेत. या कंपनी मालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणाचे नेमके कनेक्शन शोधून काढण्यासाठी महाड एमआयडीसी पोलिसांनी कंबर कसली आहे.
www.konkantoday.com