
गुहागरच्या सुपुत्राने दक्षिण आफ्रिकेत शैक्षणिक संस्था स्थापन करून केला मराठीचा प्रसार.
दक्षिण आफ्रिकेतील मोझाबिकमध्ये गुहागर तालुक्यातील जानवळे येथील एका ४० वर्षीय तरूणाने शैक्षणिक संस्था स्थापन करून तेथील भाषांबरोबरच मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात योगदान दिले आहे. भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन घडवणारा त्याचा हा समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.आपल्या देशातील राज्यांमध्ये तेथील स्थानिक परकीय भाषांवरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे वाद सातत्याने निर्माण होत असतात. महाराष्ट्रात तर नुकत्याच केंद्र सरकारच्या त्रिभाषिक शिक्षण पद्धतीवरून राजकीय वाद उफाळून आल्याचे सर्वांनीच अनुभवले आहे. अशा स्थितीत गुहागर तालुक्यातील जानवळे येथील अजय अशोक जांभळे या मराठी तरूणाने दुसर्या देशात जावून केलेला शिक्षणाचा प्रसार व विशेष करून मराठी भाषेचा जागर व भारतीय संस्कृतीचे घडवून आणलेले दर्शन सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.www.konkantoday.com




