
रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथे विषारी द्रव प्राशन केलेल्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथे विषारी द्रव प्राशन करणार्या तरूणीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रणाली प्रकाश गार्डी (२६, रा. वेळवण, रत्नागिरी) असे मृत तरूणीचे नाव आहे. प्रणाली हिने १८ जुलै रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
प्रणाली ही १७ जुलै रोजी आपल्या आईसोबत बहिण दिपाली घाटकर हिच्या कुवारबाव येथील घरी आली होती. यानंतर १८ जुलै रोजी सकाळी प्रणाली हिने विषारी द्रव प्राशन केले होते. यावेळी नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. यावेळी तिची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




