
शिवसेना पक्ष व चिन्ह वादाचा निकाल पुन्हा लांबणीवर; न्यायमूर्ती सूर्यकांत घटनापीठात समाविष्ट झाल्याने प्रकरण पुढे सरकण्याची शक्यता
मुंबई, ३० जुलै ): शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून, या प्रकरणाचा निकाल २० ऑगस्ट रोजी अपेक्षित होता. मात्र, आता हा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या प्रकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठाचे सदस्य आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारातील प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितला आहे. त्यानुसार न्यायालयाने १९ ऑगस्टपासून सुनावणीस सुरुवात होणाऱ्या घटनापीठाची स्थापना केली असून, न्यायमूर्ती सूर्यकांत हे या पिठाचे सदस्य आहेत. त्यामुळे ते सध्या शिवसेना वादावर सुनावणी करू शकणार नाहीत.
या घटनापीठाची सुनावणी १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. परिणामी, शिवसेना व चिन्ह वादाचा निर्णय १० सप्टेंबरनंतरच येण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरच हा वाद अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रकरणावर अंतिम निर्णय लांबणीवर गेला आहे. यामुळे शिवसेना व ठाकरे गटाच्या अपेक्षांना आणखी थांबावे लागणार आहे.
*