
भारताची अर्थव्यवस्था बुडण्याच्या मार्गावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या X पोस्टमुळे खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियावर सडकून टीका केली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी केलेल्या पोस्टमधून भारताच्या व्यापार धोरणावर आक्रमक भाषेत नाराजी व्यक्त केली असून, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांना ‘धोक्याच्या मार्गावर चालला आहे’ असा थेट इशाराही दिला आहे
ट्रम्प यांनी लिहिलं, “भारताने रशियासोबत काय करावं यात मला रस नाही . ते दोघेही त्यांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था घेऊन खाली जायला मोकळे आहेत. आम्ही भारतासोबत फारच कमी व्यापार करतो. त्यांचे आयात कर (टॅरिफ्स) हे जगात सर्वाधिक आहेत.”त्यांच्या या वक्तव्यामध्ये भारताच्या उच्च टॅरिफ धोरणावरून असलेली दीर्घकालीन नाराजी पुन्हा एकदा व्यक्त झाली. अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यापार करताना ज्या अडचणी येतात त्यावरून ट्रम्प प्रशासनातही याआधी वेळोवेळी नाराजी दिसून आली होती.ट्रम्प यांच्या या विधानामुळे भारत-अमेरिका संबंधांवर तणाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि रशियामधील संबंध घनिष्ठ होत असून, उर्जा, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या “ते बुडणाऱ्या अर्थव्यवस्था घेऊन बसा” या वाक्याचा अर्थ केवळ व्यापारापुरता मर्यादित राहात नाही, तर त्यात राजकीय टोलाही आहे.