
चिपळूण तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीने घेतला अखेरचा श्वास
पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर श्रीपतराव सुर्वे (९१), संगीता मनोहर सुर्वे (८१, दोघेही निवळी) असे या पती-पत्नीचे नाव आहे.
मनोहर सुर्वे हे रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते तर संगीता सुर्वे या गृहिणी होत्या. त्यांनी आपले निधन झाल्यावर अंतिम विधी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीत व्हावेत असे यापूर्वीच लिहून ठेवले होते. गेले काही दिवस मनोहर सुर्वे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. असे असताना त्यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पत्नी संगीता यांनीही काही मिनिटात जगाचा निरोप घेतला.www.konkantoday.com