
जर कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळे फसणार,- राजू खेतले यांचा इशारा
दोन वर्षात ११ कोटी रुपये खर्च केलेत. मग हा निधी गेला कुठे, तुमच्या बापाचा हा पैसा आहे का ?…लक्षात ठेवा, या खड्ड्याचे पाप तुम्हाला फेडायला लावणारच. फक्त तुम्ही ठेकेदार आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करू नका मग बघतो…असा आक्रमक इशारा मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी देऊन जर कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळे फसणार असा इशारा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.सती ते कुंभार्ली राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डी पर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे. या खड्ड्याची मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसैनिकांनी खड्ड्याची पूजा करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने टाहो फोडला