
कोकण रेल्वे मार्गावर ’दिवा-सावंतवाडी’ आंजणीत थांबणार.
कोकण मार्गावर नियमितपणे धावणार्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला आंजणी स्थानकात कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने थांबा मंजूर केला आहे. त्यानुसार २८ जुलैपासून एक्सप्रेस आंजणी स्थानकात थांबणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजून १९ मिनिटांनी एक्सप्रेस स्थानकात दाखल होणार आहे. सर्व ग्रामस्थ स्थानकात जल्लोषात स्वागत करणार आहेत.कोकण मार्गावर एक्स्प्रेस गाड्या धावू लागल्यापासून गावाहून मुंबईला जाताना व मुंबईहून येताना दिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी स्थानकात थांबत होत्या. कोरोनानंतर थांबा रद्द केला होता.www.konkantoday.com




