
कळंबस्ते-बहादूरशेख येथील विसर्जन घाट रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात, शौकत मुकादम यांचा पाठपुरावा
चिपळूण येथील पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. बहादूरशेख-कळंबस्ते येथील वाशिष्ठी नदीकिनारी बंद ठेवण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाला रविवारी सकाळपासून पुन्हा सुरूवात झाली आहे. मातीचा भराव टाकून येथे रस्ता तयार केला जात असल्याने श्री. मुकादम यांनी समाधान व्यक्त केले.विसर्जन घाटाकडे जाणार्या रस्त्याचे काम शासकीय यंत्रणेच्या अधिपत्याखाली होत नसल्याचे सांगत तेथील पोकलेन हलविण्यात आला होता. त्यामुळे चार दिवस सुरू असलेले काम थांबले होते.www.konkantoday.com