
ऍग्रोस्टॅक मदत कक्षाऐवजी आता व्यक्तीची नेमणूक, शेतकर्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन
शेतकर्यांचा सातबारा मोबाईल नंतर व आधारशी जोडण्यासाठी ऍग्रोस्टॅक ही नवी योजना सरकारने लागू केली आहे. या प्रक्रियेत येणार्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मदतकक्ष रद्द करण्यात येवून आता नवीन मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे.
जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रामध्ये कोकण विभागासाठी सोनाली वाडेकर यांच्याकडे मदतीसाठी जबाबदारी देण्यात आली असून ९४०४९५३५१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com