जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे गुहागर येथे मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन.

आबलोली : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे कार्यालय देवपाठ बाजारपेठ (गुहागर) येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक व शिवसेना – उपनेते निलेश भगवान सांबरेयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प. पू. सदगुरू श्री आलोकनाथजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र भोगवती नगर, तानसा), ॲड. प्रसाद जांगळे यांच्यासह जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी प्रशिक्षण केंद्र कार्यालयाची पाहणी केली. यावेळी प्रसाद जांगळे यांच्या हस्ते मार्गदर्शन पुस्तिका देऊन निलेश सांबरे यांचा सत्कार करण्यात आला.

या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये एमपीएससी, एसएससी एमटीएस जीडी, पोलीस अग्निशमक दल भरती, शासनाच्या विभागीय भरती, बँकिंग आर आर बी., पी एस.यु. या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी तज्ञ मार्गदर्शन कडून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कुठल्याही जाती धर्माच्या, पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी २००८ पासून निलेश सांबरे यांनी काम करायला सुरुवात केली. आज संपूर्ण कोकणात काम करत आहेत. त्यांनी चालू केलेले उपक्रम, विविध, सुविधा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, महिला सक्षमीकरण अशा अनेक सुविधा आहेत. त्यांनी चालू केलेल्या उपक्रमांची व सुविधाची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button