
बळीराज सेना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड.
आबलोली बळीराज सेना या राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात कोकणातील ७ जिल्ह्यांच्या निवड प्रकिया करुन पक्ष प्रमुख अशोकदादा वालम यांचे विचार आणि कार्यपद्धती तसेच बळीराज सेना या पक्षाची ध्येय, धोरणे आणि उद्दीष्टे सोशल मीडिया मार्फत कोकणाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार असल्याचे दिनेश हरड यांनी सांगितले.