
चिपळूण तालुक्यात स्मार्ट मीटर बसविल्यामुळे वाढत्या बिलामुळे वीज ग्राहक हैराण, मोर्चाच्या तयारीत
चिपळूण तालुक्यात बसवल्या जाणार्या स्मार्ट मीटरमुळे महिनाभरातच बिले वाढल्याने मार्गताम्हाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ २३ रोजी मार्गताम्हाने बाजारपेठेत मोर्चा काढणार आहेत. तसे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच सरपंच संघटनेनेही साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ग्राहक तर गुपपूच येवून मीटर बदलून जाणाया कर्मचार्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देण्याची तयारी करीत आहेत. यामुळे स्मार्ट मीटर विषय पेटण्याची शक्यता आहे.
मार्गताम्हाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून नवीन खासगी मीटर बसवले जात आहेत. घरमालकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकाला विश्वासात न घेता खासगी कंपनीचे कर्मचारी मीटर बसवत आहेत. या मीटर माध्यमातून वीजबिलांच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ३१ जुलै रोजी मार्गताम्हाने येथे महावितरणच्या कार्यालयाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.
www.konkantoday.com