
संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर भुसेवाडी येथे नैराश्यातून वृद्धाची गळफासाने आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर भुसेवाडी येथे कौटुंबिक वादातून नैराश्यात गेलेल्या ५८ वर्षीय पित्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीवरून मृताचे नाव कमलाकर शंकर गायकर यांनी आपल्या राहत्या घरी हॉलमधील सिलिंग फॅनच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास ते २३ जुलै रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खबर देणारे ऋषिकेश गायकर हे गेल्या ३ महिन्यांपासून एकेट राहत होते. नैराज्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही माहिती मिळताच माखजन पोलीस दूरक्षेत्र व संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्यातर्फे नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
www.konkantoday.com