
शृंगारतळी येथे लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली :
गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचेउद्धारकर्ते, दैवत आणि श्रद्धास्थान, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथील लोकनेते,माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात समाज शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवराचे हस्ते लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलीत करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध ऊभे राहून लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर समाज शाखेच्या वतीने गेल्यावर्षी लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या स्मृती दिन हा संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निश्चय करण्यात आला होता त्याप्रमाणे लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचे सुपूत्र राजेश बेंडल यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा आणि कुणबी समाजाचा हक्काचा आमदार आपला आमदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला परंतू राजेश बेंडल यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला असला तरी २०२९ मध्ये आमचा गरीबांचा, कुणबी समाजाचा हक्काचा आमदार म्हणून राजेश बेंडल यांनाच निवडून आणण्याचा निर्धार आणि संकल्प लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या ३१ व्या स्मृती दिनी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण या धर्म संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी पक्ष गुहागरचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर,मुस्लिम समाजाचे माहामुद कादीर बारमारे गुरुजी , महेश कातकर,सुधीर टाणकर, विजय पागडे, सुनील रामाणे, अनंत गावडे, मंगेश मते, धनंजय शिगवण, गिरीश बारस्कर, चंद्रकांत पागडे, स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपूत्र माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, समाज शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे,समाज शाखेचे सल्लागार रामचंद्र हुमणे गुरुजी, समाज शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांना मनोगतातून आदरांजली अर्पण करण्यात आली . यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते, मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे, समाज शाखेचे माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, सचिव प्रदिप बेंडल,उपाध्यक्ष तुकाराम निवाते, महादेव साटले, विलास वाघे, अनंत पागडे, शंकर मोरे, मंगेश मते, साहिल आरेकर, बरमारे गुरुजी, चंद्रकांत पागडे,विजय अवेरे आदी. मान्यवर उपस्थित होते .या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाज शाखेचे सचिव प्रदिप बेंडल यांनी केले.यावेळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते