
दुसऱ्यांना भोजन देणाऱ्या शिव भोजन केंद्राचालकांवरच आली आहे उपासमारीची वेळ
राज्य शासनाकडून गोरगरीब, गरजू, मजुरांना कमी पैशात पोटभर जेवण मिळावे म्हणून 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. कोरोनापूर्वी आणि कोरोनात ही थाळी मजूर, गोरगरिबांची आधार बनली होती.मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांना उतरती कळा लागली असून आतापर्यंत 14 शिवभोजन केंद्रे बंद झाली आहेत, तर 12 शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे अनुदान मागील़ चार महिन्यांपासून थकले आहे. जर सरकारने अनुदान लवकरात लवकर न दिल्यास शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली शिवभोजन केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत आहेत.