
कार ऑन ट्रेन सेवा कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसणारी, रत्नागिरी व सिंधुदुर्गात एकही थांबा नाही
कोकणातील चाकरमान्यांसाठी कार ऑन ट्रेन सेवा सुरू करण्याची गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वे महामंडळाने घोषणा केली मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. कारण या सेवेचा रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही थांबा देण्यात आलेला नाही. कोकण रेल्वेने २३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली आहे. कोलाड येथे ट्रेनवर कार चढवण्याची सोय असून गोव्याला उतरण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठेही थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे चाकरमानी मंडळी नाराज आहेत.
आपली कार घेवून गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी लोकांना फिरता यावे, यासाठी कोकण रेल्वने कार ऑन ट्रेन ही सेवा घोषित केली आहे. कोकण रेल्वेने अनेक वर्ष रो रो सेवा केवळ मालवाहतुकीसाठी उपलब्ध केली होती. आता प्रवाशांसाठी पहिल्यांदाच कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली आहे. १२ वर्षाहून अधिक काळ रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि रस्ता प्रवासात होणारे प्रचंड त्रास टाळण्यासाठॅ रेल्वेसेवेचा उपयोग होणे शक्य आहे. म्हणून त्याकडे पाहिले जात होते. कोलाड ते गोवादरम्यान कोठेही त्या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे जे प्रवासी थेट गोवा अथवा त्या परिसरात कार घेवून जाणार असतील त्यांच्यासाठी ही सेवा लाभाची ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मात्र या सेवेचा उपयोग होणार आहे. म्हणून चाकरमानी मंडळौ नाराज आहेत
.www.konkantoday.com