
मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे चक्का जाम आंदोलन रद्द.
रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नियोजित चक्का जाम आंदोलन रद्द करून त्या ऐवजी लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी घोषणाबाजी करत लांजा तहसील कार्यालयात निवेदन देवून शासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त करण्यात आला.प्रहार दिव्यांग कतिी संघटनेचे नेते, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शासनाकडे शेतकरी कर्जमाफी दिव्यांग मानधन वाढ व अन्य विविध प्रश्नासंदर्भात केलेल्या मागण्यांबाबत शासनाकडून अद्यापही प्रतिसाद न मिळाल्याने २४ जुलै रोजी राज्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने लांजामध्ये चक्का जाम आंदोलनाचे आयोजन केले होते.www.konkantoday.com