रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत आगाशे यांच्यामंत्र आरोग्याचा पुस्तकाचे रविवारी प्रकाशन.

रत्नागिरी : येथील योगशिक्षक, योगसाधक अनंत आगाशे लिखित पुस्तक ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या रविवारी दि. २७ जुलै रोजी सायं. ५.३० वा. नाचणे येथील ॐ साई सांस्कृतिक भवनात होणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमा जोग, बी.ए. योगशास्त्र सुवर्णपदक प्राप्त तथा पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने, सह योगशिक्षिका सौ. पौर्णिमा दाते उपस्थित राहणार आहेत.श्री. आगाशे हे स्वतः योग शिक्षक असून गेली १५ वर्षांपेक्षा अधिक काळ ॐ साई सांस्कृतिक भवन येथे निःशुल्क योग वर्ग घेत आहेत. या पुस्तकाचे लेखन श्री. अनंत आगाशे आणि त्यांचे सहकारी योग शिक्षक मिलिंद सरदेसाई यांनी केले आहे.

या पुस्तकातून नवीन योग शिकू इच्छिणाऱ्या लोकांना थोडासा सराव व पुस्तक वाचून घरी योग प्राणायाम करता येईल. त्यासाठीच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी दररोज या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्य नमस्कार याचा सराव करावा व निरोगी राहावे.रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या पदोपदी सर्वांनाच भेडसावत आहेत. बदलती जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे कशाला महत्त्व द्यायचे याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा आणि या प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत आगाशे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button