
संस्कृत सप्ताहानिमित्त रत्नागिरीत निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
रत्नागिरी, दि. २३ : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक चे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र आणि यांच्यावतीने संस्कृत सप्ताह निमित्त १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान दररोज सायं. ५.३० वाजता निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्टँड जवळ, रत्नागिरी येथे घेण्यात येणार असून, यामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/D3cqWXj5NsCuqEQe8 या लिंकवर किंवा प्रा. अक्षय माळी (मो. 7798490615) यांच्याशी संपर्क साधावा.
हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, योगामध्ये रस असणाऱ्या विशेषतः महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.