
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वेा फाटकाचा प्रश्न अजूनही तसाच, चक्क प्रवाशांनी उचलले रेल्वे फाटक.
चिपळूण भागातील काेकण मार्गावर असलेल्या कळंबस्ते रेल्वे फाटकाबाबत अनेक तक्रारी आल्या असून काहीवेळा रेल्वे फाटक रेल्वे येत असताना देखील उघडेच राहत असल्याच्या तक्रारी झाल्या हाेत्या. याबाबत रेल्वे विभागाने थातुरमातुर खुलासा केला हाेता. मात्र आता परत शनिवारी असाच एक प्रकार घडला आहे. या ाट्यावरून एक मालगाडी गेल्यानंतर फाटक वर न झाल्याने प्रवाशानेच हाताने उचलून फाटक वर केले व तेथून वाहतूक सुरू झाली मात्र पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रेल्वे फाटक वारंवार नादुरूस्त हाेत असून कधी हे ाटक बंद हाेत नाही. तर कधी वर येत नाही. असे प्रकार गेल्या महिन्यात तीनवेळा घडले आहेत. त्यामुळे याबाबत तातडीने लक्ष घालण्यात यावे अशी मागणी काेकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शाैकत मुकादम यांनी केली आहे.www.konkantoday.com