
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचा कोकण दौरा रद्द
रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्र व कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी पुरग्रस्तांच्या मदतकामात गुंतले आहेत. यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर त्यांची महाजनादेश यात्रा २७, २८ व २९ ऑगस्ट रोजी येणार होती. तो दौरा आता रद्द झाला आहे. याच दरम्याने कोकणात गणपती उत्सव येत असल्याने कोकणवासिय हा उत्सव जोरात साजरा करत असतात. यामुळे मुख्यमंत्री आता १३ सप्टेंबरनंतर या महाजनादेश यात्रेला सुरूवात करणार आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा होणार की नाही हे नंतर कळणार आहे.