
नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने गुरुपौर्णिमा भरतनाट्यम रचना, अभंगावरील नृत्याने केली अनोखी गुरु वंदना.
रत्नागिरी: नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने नुकतीच गुरुपौर्णिमा अतिशय आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी गुरुपूजन, घुंगरू पूजन आणि भरतनाट्यम चे सादरीकरण करण्यात आले. नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि गुरु सौ. प्रणाली तोडणकर धुळप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर चे शिक्षक प्रकाश कदम, उदयोन्मुख गायक सतीश राठोड हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर श्रीमती सुप्रिया तोडणकर, सिद्धेश धुळप यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या शिष्यांकडून गुरुपूजा आणि घुंगरू पूजा करण्यात आली.
त्यानंतर नृत्यगनांनी भरतनाट्यमच्या विविध रचनांवर तसंच अभंगावर आधारित नृत्य सादर केलं यावेळी विशारद झालेल्या कु. स्वरादा उमेश लोवलेकर आणि केतकी मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच शैक्षणिक आणि भरतनाट्यमच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या बिलवा रानडे, श्रेया चव्हाण, भूमिका गुरव, भक्ती जोशी, तीर्थ वैद्य, आभा भाटवडेकर, ईश्वरी खाडीलकर, आदिती टिकेकर, वैदेही पाटकर, कल्याणी चव्हाण, प्रार्थना बोरकर, ओवी साळवी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शेवटी पावस टिळक आळी आणि मारुती मंदिर शाखेतील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचं त्यांचं कौतुक करण्यात आलं.