
प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने, दापोली तालुक्यातील गावतळेविद्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम
दापोली तालुक्यातील गावतळे विद्यालयात गडकिल्ल्यांची आठवण पावलोपावली दिसत आहेत. प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने नामकरण करण्यात आले आहे.तालुक्यातील गावतळे विद्यालयाचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.येथील प्राध्यापक संदीप वारके यांची संकल्पना कौतुकास पात्र ठरत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून काल घोषित होण्याआधीच 19 जून पासून हा उपक्रम राबवला गेला आहे. बरेचदा छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना नसते. या साठी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास या ठिकाणी उभा करण्यात आला आहे.
महाराजांच्या 9 गडकिल्ल्यांची छायाचित्रे वर्गाबाहेर लावण्यात आली आहेत, तर इयत्ता 5 वी ते 12 आशा 8 वर्गखोल्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. याचबरोबर महाराजांची वंशावळ, मराठा कालखंड (1630 ते 1818), आज्ञापत्र अशी परिपूर्ण माहिती अनेकठिकाणी लावण्यात आलेली आहे. ज्या किल्ल्यांचे छायाचित्र लावण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याची भव्यता आणि बांधकाम शैली याचे दर्शन विद्यार्थ्यांना होते.