शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणें

महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला.तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे दहशतवादी घडवण्याचं काम होते. बुलढाण्यात एका मदरशात यमनचे नागरिक सापडले. असंख्य मदरशांमध्ये जिलेटिन काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजात भांडणे लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका असं आव्हान त्यांनी दिले.तसेच हिंदी सक्तीचा निर्णय कुणी घेतला, जीआर कुणी मागे घेतला हे राज ठाकरेंनी समजून घेतले तर त्यातील व्हिलन कोण, शकुनी मामा कोण हे कळेल.

मराठी मेळाव्यात ज्याच्यासोबत तुम्ही हातात हात घातला तोच खरा हिंदी सक्तीचा शकुनीमामा आहे. आज सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे का, माझा भाऊ सुरू आहे. बंधू प्रेम आहे मग आज बातमी का नाही..त्यामुळे खरा शकुनीमामा कोण तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीविरोधात मोर्चे काढायचे असतील तर त्याला जबाबदार धरा असं सांगत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button