
लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन.
तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व कॉमेडियन फिश वेंकट यांचं निधन झालं आहे. वेंकट यांच्या निधनाने तेलुगु सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वेंकट हे फक्त 53 वर्षांचेचं होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.वेंकट हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनी व यकृताचा आजार होता. अशातच मागील काही दिवासांपासून त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्यांना नियमित डायलेसिस सुरू होतं. ते गेल्या काही महिन्यांपासून आयसीयूमध्ये उपचार घेत होते. पण अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.