
निधीच्या अडचणीमुळे गुहागरातील २४३ पथदीपांना अजूनही प्रतिक्षा.
गुहागर नगरपंचायतीच्या स्थापनेपासून दोन्ही टर्ममध्ये शहर प्रकाशमान करण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्ची पडला. मात्र तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च करून नव्याने उभे राहिलेले २४३ पथदीप गेली तीन वर्षे प्रकाशन होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पथदीपांना अजूनही चार्जिंगची परवानगी नसल्याने व यातच निधी उपलब्ध होण्यास मंत्रालयाच्या अटीची अडचण उभी राहिल्याने पथदीप प्रकाशनमान होण्यासाठी अजून किती दिवस गुहारवासियांना प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्नच आहे.पूर्वीच्या व त्यानंतरच्या कार्यकारिणीने मिळून शहरात ६५० पथदीपांची उभारणी केली. मात्र पहिल्यांदाच उभारलेले दिवे सुरु ठेवण्यासाठी नगर पंचायतीला कमरत करावी लागत आहे. ७ आणि ९ मिटर उंचीवरील दिवे दुरुस्तीसाठी – हायड्राचा वापर करावा लागत आहे.www.konkantoday.com