
महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाचा BCA निकाल जाहीर
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी येथे चालवण्यात येणाऱ्या बीसीए या पदवी अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावर्षी महाविद्यालयाच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले असून महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावला आहे.
या निकालामध्ये कु. मंजिरी कांबळे हिने ७९. ४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक ,कु समीक्षा चंदरकर हिने ७७. ६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कु. ममता जाधव हिने गुण ७७% मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. यंदा बीसीए विभागाचा निकाल ९८ टक्के लागला असून १५ विद्यार्थिनींना विशेष श्रेणी, ३२ विद्यार्थिनी प्रथम श्रेणी आणि ९ विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.बीसीए हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असून S.N.D.T महिला विद्यापीठ मुंबईशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थिनींना आधुनिक संगणक ज्ञान, तांत्रिक कौशल्य व सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यावसायिक गरजांसाठी तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज , वेब डेव्हलपमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, नेटवर्किंग,सायबर सिक्युरिटी, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट व इंडस्ट्री इंटर्नशिप या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थिनी आयटी (IT) क्षेत्रा मध्ये करियर घडवण्यासाठी सक्षम बनल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून प्रमुख आयटी (IT) कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळालेल्या आहेत. त्यामध्ये इफराह जमादार, श्रावणी पाटील आणि खुशी गोताड यांना विप्रो कंपनीमध्ये स्कॉलर ट्रेनी म्हणून संधी मिळाली आहे त्याचबरोबर खुशी गोताड हिला कॉग्निझंट या कंपनीमध्ये देखील नोकरीची संधी मिळाली आहे . चिन्मयी पवार हिला T.C.S या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या उपकार्याध्यक्ष सौ. विद्याताई कुलकर्णी ,प्रकल्प प्रमुख श्री.मंदार सावंत देसाई ,बीसीए कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.