
सावकार व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची आर्थिक पिळवणूक, जनता दल सेक्युलरची मागणी.
जिल्ह्यात सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धूमाकूळ घातला आहे. अव्वाच्या सव्वा दराने कर्जाची वसुली करून महिलांची पिळवणूक केली जाते. त्यामुळे या मायक्रो फायनान्स कंपन्या व सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने शेकडो – महिलांनी निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्यासह चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे आहे.तहसिलदार प्रविण लोकरे व गटविकास अधिकारी सौ. उमा घारगे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसिलदार प्रवीण लोकरे यांना निवेदन देताना महिला. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नियमबाह्य कर्ज वाटप करून आर्थिक साक्षर नसलेल्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. आधीचे कर्ज फेडण्यासाठी दूसरे, तिसरे कर्ज दिले जात आहे.www.konkantoday.com