
सावर्डे येथे आराखडयात रस्ता व मंदिराचा समावेश नाही -संदीप सावंत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे येथील पोलीस स्थानक, तलाठी कार्यालय आणि महापुरूष मंदिर बाधित झाले. या तिन्हींच्या पुर्नबांधणीसाठी सुमारे पावणेतीन कोटीचा निधी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केला. तब्बल तीन वर्षानंतर या कामांना सुरवात झाली आहे. मात्र एकाच जागा परिसरात बांधण्यात येणार्या मंदिरासह पोलीस स्थानक आणि तलाठी कार्यालयाच्या तयार केलेल्या आराखड्यात रस्ता आणि मंदिराचा समावेश नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि या कामांसाठी पूर्वीपासून पाठपुरावा करणारे संदीप सावंत यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे.www.konkantoday.com