
चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद, शंभरहून अधिक महिलांचा सहभाग.
’चिपळूण नगर पालिका, सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ या विशेष स्पर्धेला शहरातील महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्र मात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला असून, अजूनही महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.ही स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार असून, चिपळूण शहरातील सर्व महिलांना सहभागाची संधी खुली आहे. प्लास्टिकमुक्त घडवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणार्या या उपक्रमामध्ये सहभागी महिलांनी आपल्या घरातून चिपळूणचिपळूण होम मिनिस्टर २०२५ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलेला कुपन देताना कर्मचारी. प्लास्टिक संकलन करायचे आहे. नगर परिषदेकडून घरपोच गाडी पाठवण्यात येणार असून संकलित प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना कुपन दिले जाणार आहेत.www.konkantoday.com