
चिपळूण नगर पालिकेला शासनाकडून नवीन शववाहिका.
चिपळूण येथील नगर पालिकेला वाहन ताफ्यात नवीन अत्याधुनिक शववाहिकेचे आगमन झाले आहे. शासनाकडून मंगळवारी ही शववाहिका चिपळुणात दाखल झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी श्रीफळ वाढवत या वाहनाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः या शववाहिकेचे स्टेअरिंग हाती घेत वाहनांतील सुविधा जाणून घेतल्या. उपसंचालक, आरोग्य सेवा, परिवहन, पुणे या कार्यालयाकडून जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर दोन अशा एकूण तीन शववाहिका जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाल्या आहेत.www.konkantoday.com