
जाकादेवी येथे ट्रक-टेम्पो अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी-तरवळ येथे ट्रक-टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुजक्कीर अमजद जांभारकर (२५, रा. पडवे ता. गुहागर) असे त्याचे नाव आहे. मुजक्कीरला उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले होते. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुजक्कीरचा मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय येथे आणला. येथे त्याचे शवविच्छेदन होवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.१५ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तरवळ-जाकादेवी येथे ट्रक व टेम्पोमध्ये समोरासमोर धडक झाली होती. यात टेम्पोमधील अमजद जांभारकर, मुजक्कीर जांभारकर व त्यांच्यासोबत असणारी महिला फिरदोस खळे हे गंभीर जखमी झाले होत्या. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.www.konkantoday.com